Chandrapur | ताडोबा-अंधारीत वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा(Tadoba-Andhari Tiger Project)तील ‘छोटी मधू’ वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झालीय. नागपूरच्या काही पर्यटकांनी टायगर सफारीसाठी मोहर्ली भागातल्या जुनोना बफर प्रवेशद्वारातून प्रवेश घेतला होता. त्यावेळी वाघिणीला त्यांनी पाहिलं.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा(Tadoba-Andhari Tiger Project)तील ‘छोटी मधू’ वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झालीय. नागपूरच्या काही पर्यटकांनी टायगर सफारीसाठी मोहर्ली भागातल्या जुनोना बफर प्रवेशद्वारातून प्रवेश घेतला होता. सफारीदरम्यान त्यांना ‘छोटी मधू’ वाघिणीनं दर्शन दिलं. काहीच वेळानं ‘छोटी मधू’नं सांबर वन्यजीवाची शिकार केली. त्यानंतर दमदार पावलं टाकत जिप्सीच्या दिशेनं आली. छोटी मधूच्या या आगळ्यावेगळ्या दर्शनानं पर्यटक मात्र मंत्रमुग्ध झाले.