श्रीमंत लौकीक असणाऱ्या PMC च्या PMPML च्या मालमत्तेचा लिलाव? काय आहे कारण
VIDEO | PMPML मालमत्तेचा होणार लिलाव? पुणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर का आली अशी वेळ?
पुणे : श्रीमंत नगरपालिका असं नाव लौकीक असणाऱ्या पुणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर लिलाव करण्याची वेळ आली आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त भागीदारीत असेलेली परिवहन सेवा पुरवणारी उपकंपनी पीएमपीएमएलवर ही वेळ आली आहे. या आधी ठेकेदारांचे पैसे न दिल्याने अडचणीत आलेल्या पीएमपीएमएलला न्यायालयाच्या आदेशानुसार काही मालमत्तेचा लिलाव करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 2017 मध्ये पीएमपीएमएल आणि काही ठेकेदारांमध्ये दंडाविरुध्द वाद झाला. निविदा अटींची भंग झाल्याचा ठपका ठेवत ऑपरेटर्सना दंड ठोठावण्यात आल्यानंतर हा वाद लवादाकडे सोपवण्यात आला. लवादाने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर PMPMLने चुकीच्या पद्धतीने दंड लावला असल्याने तो व्याजासह ऑपरेटरला परत करावा असे निर्देश दिले. दरम्यान, लिलावाची वेळ जर प्रत्यक्षात आली तर मात्र PMPMLबरोबरच PMC आणि PCMC यांच्याकरता सुध्दा ती नामुष्की असणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.