मुख्यमंत्री म्हणून कोणाला पंसती? एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे की दुसरंच कोणी? सर्व्हेतून मोठा दावा
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारचा दारूण पराभव झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. वर्षा अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगताना दिसणार आहे.
महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मत मिळवण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. तर लाडकी बहीण सारखी योजना आणत विधानसभा निवडणुकीसाठी मतांची पेरणी सुरू केली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी टाईम्स MATRIZE ने केलेल्या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार? निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा अंदाज वर्तविला आहे. टाईम्स-MATRIZE च्या सर्व्हेनुसार, 27 टक्के जनतेची पसंती मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नावाला 23 टक्के जनतेची पसंती आहे. यासोबतच 21 टक्के जनतेची पसंती असल्याचे समोर आले आहे. मात्र हा केवळ सर्व्हेनुसार समोर आलेला अंदाज आहे. अद्याप विधानसभा निवडणूक पार पडायची आहे. त्यानंतर निवडणुकीचा येणारा निकाल आणि मग राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.