विधानसभेत कोणाला किती जागा? कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? काय सांगतो सर्व्हे?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. समोर आलेल्या एका सर्व्हेनुसार, विधानसभेत कोण पुढे राहू शकतं, त्या आकड्यांवरून नेमका कोणता वाद रंगलाय? पाहुया.. टाईम्स मॅट्रिझकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार कोणाला किती जागा मिळणार?
टाईम्स मॅट्रिझकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज वर्तविला गेलाय. मात्र याच सर्व्हेत लोकसभा निकालाआधीचे सर्व आकडे खोटे ठरल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. टाईम्स मॅट्रिझकडून करण्यात आलेल्या सर्व्हेत महायुतीमध्ये भाजपला ९५ ते १०५ जागा, शिवसेनेला १९ ते २१ जागा, राष्ट्रवादीला ७ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला ४२ ते ४७ जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला २६ ते ३१ जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला २३ ते २८ जागा मिळण्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी टाईम्स MATRIZE ने केलेल्या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार? निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा अंदाज वर्तविला आहे. टाईम्स-MATRIZE च्या सर्व्हेनुसार, २७ टक्के जनतेची पसंती मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नावाला २३ टक्के जनतेची पसंती आहे.