विधानसभेत कोणाला किती जागा? राज्यात कुणाला बहुमत? अपक्षांच्या हाती सत्तेची चावी? सर्व्हेतून काय आलं समोर?
टाईम्स मॅट्रिझकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार कोणत्याच पक्षाला, शिवाय महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. टाईम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. बघा कोणाला किती जागांवर विजय मिळणार?
टाईम्स-MATRIZE या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत कुणालाच बहुमत मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. टाईम्सच्या या सर्व्हेनुसार, भाजपला 95 ते 105 जागा मिळू शकतात. तर शिवसेना शिंदे गटाला 19 ते 24 जागा येण्याचा अंदाज आहे. यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 7 ते 12 जागांवर विजय होऊ शकतो. शिवसेना ठाकरे गटाचे 26 ते 31 उमेदवार निवडून येऊ शकतात. दरम्यान, काँग्रेस 42 ते 47 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 23 ते 28 जागावर विजय मिळवता येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अन्य पक्षांना 11 ते 16 जागांवर यश मिळण्याची शक्यता असून अपक्षांच्या हाती सत्तेची चावी जाण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांपैकी एकनाथ शिंदे यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे.