Tirupati Balaji laddu row : तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल

| Updated on: Sep 20, 2024 | 11:32 AM

एका प्रयोगशाळेतील अहवालावरुन ही बाब समोर आली आहे. बालाजीच्या प्रसाद लाडूमध्ये बीफ आणि फीश ऑईल वापल्याचा आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी (टीडीपी) यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींवर केला आहे. तर नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेलं आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराची ओळख आहे. बालाजीच्या दर्शनासाठी कोट्यवधी भाविक मंदिरात दाखल होत असतात. या ठिकाणी भाविकांना दर्शनानंतर प्रसाद म्हणून एक मोठा लाडू देण्यात येतो. या प्रसादाच्या लाडूमध्ये बीफ म्हणजे चरबी आणि माशांचं तेल वापरण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तिरूपती मंदिरातील लाडूमध्ये चरबी मिळाल्याची पुष्टी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून करण्यात आली आहे. जनग मोहन रेड्डींच्या काळात तिरूपती देवस्थानाच्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर करण्यात आला आरोप आहे. यामुळे चंद्राबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्रप्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे. आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरूवात केली. यासह मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला असल्याचे चंद्राबाबू नायडू म्हणाले आहेत. तर चंद्राबाबू नायडू यांनी दावा केला की, गेल्या ५ वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केले आहे. त्यांनी ‘अन्नदानम’ म्हणजे मोफत जेवणच्या गुणवत्तेशी तडजोड केली आणि आता तिरुमालाच्या पवित्र लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी वापरली,असा आरोप केलाय.

Published on: Sep 20, 2024 11:32 AM