Thane TMT Bus : ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
टीएमटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संप सुरू राहणार असल्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. पगार वाढ, दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे एक हजार पेक्षाही अधिक चालक आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
ठाण्यात अचानक टीएमटी बसेस बंद असल्याचे समोर येत आहे. अचानक सातशे हून अधिक बस चालकांनी आनंद नगर बस स्थानकात बंद फुकारला आहे. इतकंच नाहीतर त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे ठाणे शहरात प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसताय. दरम्यान, टीएमटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संप सुरू राहणार असल्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. पगार वाढ, दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे एक हजार पेक्षाही अधिक चालक आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आनंद नगर टी एम टी डेपो बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेतं. या डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्र्यातील विविध भागात बसेस रवाना होत असतात. यामुळे चाकरमान्यांना आपल्या कामावर जाण्यास विलंब होत असून विद्यार्थ्यांना देखील कॉलेज आणि शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे आज पाहायला मिळाले. तर मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.