Lonavala Bhushi Dam : मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण…
वर्षाविहार करण्यासाठी पर्यटक आता लोणावळा नगरीत दाखल झाले आहेत. मात्र लोणावळ्यात धुव्वाधार पाऊस झाल्याने भुशी धरणावरील पायऱ्यांवरील प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांना या भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी....
विकेंडमुळे भुशी धरणावर पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. विकेंडचं औचित्य साधत लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे. लोणावळ्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पाण्याचा मोठा प्रवाह येत आहे. त्यामुळे पर्यटक या पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद घेत आहे. वर्षाविहार करण्यासाठी पर्यटक आता लोणावळा नगरीत दाखल झाले आहेत. मात्र लोणावळ्यात धुव्वाधार पाऊस झाल्याने भुशी धरणावरील पायऱ्यांवरील प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांना या भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक जीवरक्षक तसेच पोलिसांकडून पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. मात्र पोलीस आणि स्थानिक जीवरक्षक यांच्याशी पर्यटक हुज्जत घालत असल्याचं चित्र देखील पहायला मिळत आहे.