WITT Global Summit : पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण चौथ्या क्रांतीबद्दल मोदींचं मोठं वक्तव्य

| Updated on: Feb 26, 2024 | 10:59 PM

दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर येतील याचा कुणी विचार केला होता. पण हे झालं आहे. आमच्याच सरकारमध्ये झालं असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. भारतात कन्झम्प्शनबाबतचा रिपोर्ट आला आहे. त्यातून नवा ट्रेंड कळतो, असे मोदी यांनी म्हटले

Follow us on

नवी दिल्ली, २६ फेब्रवारी २०२४ : आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे राहिलो. आपल्याला आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत जगाचं नेतृत्व करायचं आहे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी पुढे असेही म्हटले, भारतात रोज दोन नवे कॉलेज उघडले आहे, प्रत्येक आटवड्यााला एक विद्यापीठ उघडलं आहे, भारतात रोज ३६ नवे स्टार्टप बनले आहेत. भारतात रोज १६ हजार कोटी रुपयांचे यूएआय ट्रान्जेक्शन झालं आहे. भारतात रोज १४ किलोमीटर रेल्वे ट्रॅकचं निर्माण झालं आहे. भारतात रोज ५ हजार हून अधिक एलपीजी गॅस कनेक्शन दिलं गेलं आहे, भारतात प्रत्येक सेकंदाला एका नळातून कनेक्शन दिलं गेलं आहे. भारतात रोज ७५ हजार लोकांना गरीबीतून बाहेर काढलं आहे. आपण नेहमीच गरिबी हटावचे नारे ऐकले. दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर येतील याचा कुणी विचार केला होता. पण हे झालं आहे. आमच्याच सरकारमध्ये झालं असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. भारतात कन्झम्प्शनबाबतचा रिपोर्ट आला आहे. त्यातून नवा ट्रेंड कळतो. भारतातील गरिबी आता सिंगल डिजीटला आली आहे. या डेटा नुसार कन्झम्प्शन अडीच टक्के वाढलं आहे. गेल्या दहा वर्षात गावात कन्झम्प्शन अधिक वाढलं आहे. म्हणजे गावातील लोकांचं आर्थिक सामर्थ वाढत आहे. विकासाच्या या मॉडेलमुळे भारत सशक्त झाल्याचे त्यांनी प्रामुख्याने म्हटले.