मुंबईच्या BKC ला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, कुणी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेल्या पत्रात नेमकी काय केली मागणी? कुणी लिहिलं पत्र?
मुंबई : कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच काल मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची ही घोषणा केली. तर वांद्रे-वर्सोवा सीलिंकला (Versova Bandra Sea Link) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. इतकेच नाही तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्याची मागणीही केली. यासह आता मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ही मागणी शिवसेनेचे पदाधिकारी कुणाल सरमरकर यांनी केली आहे. बीकेसीला बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिल्याचे समोर येत आहे.