धुरळा उडणार! पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस, यासह जाणून घ्या अपडेट

| Updated on: Feb 24, 2023 | 7:56 AM

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसघात भाजप, काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लगबग सुरू

मुंबई : पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसघात भाजप, काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लगबग सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गज नेते ठाण मांडून आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अजित पवार उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. जर अपात्रतेचा निकाल आला तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या ऑनलाईन भाषणात जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार नाही, काँग्रेसला पुण्येश्वर महादेवाबद्दलची भूमिका विचारा, प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं वक्तव्य… यासह जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या बातम्या.

Published on: Feb 24, 2023 07:56 AM
चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ ट्विटवर काँग्रेसचे नेते उस्मान हिरौली यांचं स्पष्टीकरण
विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?