PM Modi आज Pune दौऱ्यावर ,मुख्यमंत्र्यांच्यावतीने Subhash Desai हजर राहणार

| Updated on: Mar 06, 2022 | 9:29 AM

तप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते आज (6 मार्च) पुणे मेट्रोचं (pune metro) उद्घाटन होणार आहे. पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. हा उद्धाटन समारंभ गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन (कोथरुड) पर्यंत होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते आज (6 मार्च) पुणे मेट्रोचं (pune metro) उद्घाटन होणार आहे. पुणेकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. हा उद्धाटन समारंभ गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन (कोथरुड) पर्यंत होणार आहे. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी दोन पर्यंत कर्वे रस्ता आणि पौड रस्ता बंद असणार आहे. नरेंद्र मोदीच्या दौ-यात पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही सोहळा ही पडणार आहे. पुण्यात नरेंद्र ज्या ठिकाणी जाणार आहेत, तिथल्या परिसरात पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray), अजित पवार हे महाविकास आघाडीतील नेते पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना जास्त प्रवास करता येत नसल्याने मुख्यमंत्री उपस्थित नसल्याचे सागण्यात आले आहे. खरं सांगायचं तर पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार असून पंतप्रधान पाच तासात पुण्यातील विविध ठिकाणांना भेट देणार आहेत, त्याचबरोबर तिथल्या अनेक कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

Special Report | ज्यांच्या भरवश्यानं यूक्रेननं दंड थोपटले, त्यांनीच यूक्रेनला पाठ दाखवली
Akola जिल्ह्यात नंदी आणि गणपती दुध पित असल्याच्या चर्चा, मंदिरात भाविकांची गर्दी