आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

| Updated on: Nov 25, 2021 | 11:58 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी एक वाजता जेवरमध्ये नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करणार आहेत. यासोबतच उत्तरप्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमातळ असलेले देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज दुपारी एक वाजता जेवरमध्ये नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करणार आहेत. यासोबतच उत्तरप्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमातळ असलेले देशातील पहिले राज्य ठरणार आहे. नोएडा विमानतळ हे दिल्ली एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या विमानतळामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरी प्रवाशांची संख्या विभागली जाईल.

Special Report | टीम इंडियाच्या डाएट प्लॅनमध्ये हलाल?
पगार वाढीनंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; गाजर दाखवत केला सरकारचा निषेध