आज पंतप्रधान मोदींची भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

| Updated on: Dec 14, 2021 | 11:30 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काशी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी हे भाजपच्या मुख्यमंत्र्यांची आज शाळा घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्र्याला त्यांच्या राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या मोठ्या योजनांवर मोदींसमोर सादरीकरण करावे लागणार आहे.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काशी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी हे भाजपच्या मुख्यमंत्र्यांची आज शाळा घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्र्याला त्यांच्या राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या मोठ्या योजनांवर मोदींसमोर सादरीकरण करायचे आहे. त्यावर मोदींच्या तिखट प्रश्नांना उत्तरही द्यावं लागेल. गेल्या काही काळात कर्नाटक, आसाम, उत्तराखंड अशा राज्यात भाजपानं खांदेपालट केलाय. तिथं मुख्यमंत्रीपदी असलेले नेते नवे आहेत. त्यामुळेच ते काय करतायत, कुठल्या योजना राबवतायत याची माहिती घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश
Nagpur Election Breaking | नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीची मतं फोडली