Tokyo Olympics | टोकियो ऑलिम्पिकमधून मोठी बातमी, मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याची संधी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला मीराबाई चानू हिनं पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं होतं. मीराबाई चानूचं रौप्य पदक सुवर्णपदकामध्ये बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Tokyo Olympics 20-2021 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला मीराबाई चानू हिनं पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं होतं. मीराबाई चानूचं रौप्य पदक सुवर्णपदकामध्ये बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सुवर्णपदक विजेती चीनची वेटलिफ्टर जजिहू हिची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे. जजिहू डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यास मीराबाई चानू हिला सुवर्णपदक मिळू शकतं. मीराबाई चानू सध्या भारतात दाखल झालेली आहे. मीराबाई चानूने 49 किलोग्राम महिला वर्गात स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं होतं.