Toll Tax Rate : महामार्गावरील तुमचा प्रवास महागणार, आता ‘इतका’ टोल भरावा लागणार

| Updated on: Jun 03, 2024 | 12:18 PM

तुम्ही आपली कार घेऊन महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची..... भारतातील टोल दर हा महागाईच्या अनुषंगाने दरवर्षी बदलला जातो. त्यानुसार यंदा महामार्गावरील साधारण 1 हजार 100 टोल प्लाझावर 3 टक्के ते 5 टक्के टोल टॅक्स दरवाढीची घोषणा करण्यात आली आहेत.

Follow us on

तुम्ही आपली कार घेऊन महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता महामार्गावरून प्रवास करणं महागणार आहे. कारण NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) कडून आजपासून 1 हजार 100 टोल प्लाझावरील टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे. NHAI ने महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात 3 ते 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. भारतातील टोल दर हा महागाईच्या अनुषंगाने दरवर्षी बदलला जातो. त्यानुसार यंदा महामार्गावरील साधारण 1 हजार 100 टोल प्लाझावर 3 टक्के ते 5 टक्के टोल टॅक्स दरवाढीची घोषणा करण्यात आली आहेत. नवीन दर आता 2 जून म्हणजेच रविवारी रात्रीपासून 12 वाजेपासून लागू केले जातील. सोमवारपासून देशभरात रोड टोल वाढणार आहेत, असे देखील NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.