विधान परिषद निवडणुकीचे टॉप 10 अपडेट्स
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघा़डी आणि भाजप यांच्यात पुन्हा चुरशीची लढत होत आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघा़डी आणि भाजप यांच्यात पुन्हा चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीत अकरावा म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. विरोधकांच्या राजकारणाला तडा देण्याचं काम केल्याचं नाना पटोलो म्हणाले. तर राज्यसभा निवडणुकीतील पराभवाचा हिशोब यावेळी चुकता होईल असं शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले. बाजीगर तो बाजीगर होता है, असं म्हणत भाजप विजयी होणार असल्याचा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय. या निवडणुकीच्या टॉप 10 बातम्या कोणत्या ते पाहुयात..
Published on: Jun 20, 2022 03:56 PM