TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 22 November 2021
आज होणाऱ्या भाजप राज्यव्यापी आंदोलनाचा अमरावती जिल्हा प्रशासनाने धसका घेतला आहे. शहरात सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 पेक्षा जास्त नागरिक बाहेर दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
आज होणाऱ्या भाजप राज्यव्यापी आंदोलनाचा अमरावती जिल्हा प्रशासनाने धसका घेतला आहे. शहरात सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 पेक्षा जास्त नागरिक बाहेर दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तीन दिवस संचारबंदीत शिथिलता देण्यात आल्यानंतर पुन्हा नवीन नियम आदेश पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा सुधारित आदेश आहेत. आज जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लागलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय इतवारा चित्रा चौक राजकमल चौक या अशा संवेदनशील ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल तैनात आहेत.