TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 29 November 2021
दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दक्षिण आफ्रिकेवरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे चिंता वाढली आहे. अशावेळी आता डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होत असून तो अधिक धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दक्षिण आफ्रिकेवरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे चिंता वाढली आहे. अशावेळी आता डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.