VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 12 May 2022

| Updated on: May 12, 2022 | 12:04 PM

नाशिक-पुणे महामार्गावर धावती दुचाकी पेटून अपघात झाला. यामध्ये बाईक चालकाचा भाजून मृत्यू (Burnt) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील गुरेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. भीमा संतु कापडी असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील भीमा संतू कापडी असे मयत दुचाकी चालकाचे नाव आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर धावती दुचाकी पेटून अपघात झाला. यामध्ये बाईक चालकाचा भाजून मृत्यू (Burnt) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील गुरेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. भीमा संतु कापडी असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील भीमा संतू कापडी असे मयत दुचाकी चालकाचे नाव आहे. सिन्नरच्या दिशेने जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. कापडी यांना काही कळण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत भीमा कापडी हे गंभीररीत्या भाजले. मात्र 90 टक्के भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात ही आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Published on: May 12, 2022 12:04 PM
Ramdas Athavle On Rana couple | राजकीय हेतूने राणा दाम्पत्यावर राजद्रोहचा गुन्हा
VIDEO : Ajit Pawar | Nana Patole यांच्या वक्तव्याला फार महत्व देत नाही : अजित पवार