VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 15 June 2022

| Updated on: Jun 15, 2022 | 12:24 PM

पिंपरी चिंचवड शहरामध्ये 38 ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे.  शहरात 188 वाहन प्रशिक्षण केंद्र असून त्यातील 38 केंद्रात त्रुटीमध्ये आढळल्याचे परिवहन कार्यालयाच्या तपासणीत समोर आले. त्यामुळे वाहन शिकवणाऱ्या संस्था अधिकृतआहेत का, हे पाहूनच नागरिकांनी तेथे प्रवेश घेऊन गाडी शिकवण्याचे धडे घ्यायला हवेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये 38 ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे.  शहरात 188 वाहन प्रशिक्षण केंद्र असून त्यातील 38 केंद्रात त्रुटीमध्ये आढळल्याचे परिवहन कार्यालयाच्या तपासणीत समोर आले. त्यामुळे वाहन शिकवणाऱ्या संस्था अधिकृतआहेत का, हे पाहूनच नागरिकांनी तेथे प्रवेश घेऊन गाडी शिकवण्याचे धडे घ्यायला हवेत. आता असे आवाहनच परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलवर यापुढे कारवाई केली जाईल. वाहन अपघातांचे प्रमाण एकीकडे वाढले असताना अशाप्रकारे अनधिकृत, त्रुटी असलेल्या संस्थांमुळे समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. आपला जीव आणि यासह इतरांचाही जीव सुरक्षित राहावा, म्हणून नागरिक चांगल्या वाहनचालक संस्थांच्या शोधात असतात, त्यात आता ही नवीच समस्या निर्माण झाली आहे.

Published on: Jun 15, 2022 12:24 PM
Bhandara Doll Wedding | चांगल्या पावसासाठी भंडाऱ्यात बाहुला-बाहुलीचं लग्न करण्याची परंपरा
Solapur School Start | सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरू