VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 15 November 2021

| Updated on: Nov 15, 2021 | 1:21 PM

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. मात्र, त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्यावर भाष्य करण्यास मी जाणकार नाही, अशी प्रतिक्रिया सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते नाशिकमध्ये बोलत होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला. मात्र, त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. त्यावर भाष्य करण्यास मी जाणकार नाही, अशी प्रतिक्रिया सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते नाशिकमध्ये बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी निधन झाले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते देशभरातून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शरद पवार यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाबाबत आस्था निर्माण करण्याचं योगदान दिलं. ते आपण विसरू शकत नाही. त्यांनी शिवरायांच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातल्याचं वक्तव्य केलं.

Muralidhar Mohol | बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत यांचं मोठं दु:ख : मुरलीधर मोहोळ
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 15 November 2021