VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 18 August 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात. ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं.