VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 19 June 2021
बारावीच्या निकालाचा आराखडा ठरवण्यासाठी आज शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. ही बैठक शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे संचालकांसोबत बैठक आहे. सीबीएसई बोर्डाच्या निकाल निकषांचा समावेश महाराष्ट्र बोर्डात करता येतो का ? याची आज चाचपणी देखील केली जाणार आहे.
बारावीच्या निकालाचा आराखडा ठरवण्यासाठी आज शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. ही बैठक शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे संचालकांसोबत बैठक आहे. सीबीएसई बोर्डाच्या निकाल निकषांचा समावेश महाराष्ट्र बोर्डात करता येतो का ? याची आज चाचपणी देखील केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही बैठक ऑनलाईन पध्दतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार आहेत. आजच्या बैठकीत बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे, यामुळे संपूर्ण राज्याचे या बैठकीकडे लक्ष लागलेले आहे. सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगितला आहे. सीबीएसईने सांगितले की दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री बोर्डचा निकालाच्या आधारावर बारावीचा अंतिम निकाल तयार केला जाणार आहे.