VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 2 May 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेतील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जंगी सभा झाली. पोलिसांनी घालून दिलेल्या मर्यादेच्या कितीतरी अधिक पटीने लोक या मैदानावर जमले होते. राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात जातीवाद, शरद पवार आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भाषण केलं. राज ठाकरे यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा जातीवादाचा गंभीर आरोप केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेतील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जंगी सभा झाली. पोलिसांनी घालून दिलेल्या मर्यादेच्या कितीतरी अधिक पटीने लोक या मैदानावर जमले होते. राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात जातीवाद, शरद पवार आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भाषण केलं. राज ठाकरे यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा जातीवादाचा गंभीर आरोप केला. तर मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन बोलत असतानाच अजान सुरु झाली. त्यावेळी राज ठाकरेंनी अधिक आक्रमक होत मशिदींवरील भोंगे हटवण्यावरुन सरकारला इशारा दिला. इतकंच नाही तर त्यांनी 4 तारखेपासून मशिदींवरील भोंग्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले.