VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 20 July 2021
वसई, विरार, नालासोपाऱ्यात मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आज सकाळच्या वेळेत शहरातील सर्व व्यवहार, लोकल सेवा, सुरळीत सुरू झाल्या. सकल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे.
वसईमधील सनसिटी गास रोडवर सलग तिसऱ्या दिवशीही जवळपास तीन फूट पाणी आहे. या साचलेल्या पाण्यात चक्क एक भलीमोठी बस बंद पडल्याने अडकून पडली आहे. दोनच दिवसापूर्वी एक एक्सयूव्ही कार देखील पाण्यात अडकली होती. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला दोरी आणि ट्रॅक्टरच्या साह्याने बाहेर काढली होती.
वसई, विरार, नालासोपाऱ्यात मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आज सकाळच्या वेळेत शहरातील सर्व व्यवहार, लोकल सेवा, सुरळीत सुरू झाल्या. सकल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचारा साचला आहे. वसई विरार महापालिकेचे स्वच्छता दूत सकाळपासूनच कचरा उचलत आहे.