VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 29 December 2021
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचं काल सूप वाजलं. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील चर्चेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचं सांगितलं.
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचं काल सूप वाजलं. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गृह विभाग आणि पोलीस दल यांसदर्भातील चर्चेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचं सांगितलं. दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना 12 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करता येईल, अशी माहिती दिली. राज्य सरकारचा प्रयत्न हा कालावधी 10 वर्षे करण्याचा प्रयत्न होता. मात्र, 10 वर्षांचा कालावधी करण्यास तांत्रिक अडचणी असल्यानं 12 वर्ष निश्चित करण्यात आल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.