VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 29 October 2021
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला होता. मलिक यांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रति टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला होता. मलिक यांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रति टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? कोण कोणाचा पोपट आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. आमच्यासाठी नाही, असं फडणवीस म्हणाले.