VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 3 September 2021
महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या अंतर्गत मुलुंड क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल चालविले जाते. या दोन्ही संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या अंतर्गत मुलुंड क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल चालविले जाते. या दोन्ही संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोध केला आहे. राणे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ललित कला प्रतिष्ठाणकडून मागवण्यात आलेले अभिरुची स्वारस्य अर्ज फक्त दिखावा आहे. एकदा खासगीकरण झाले की यात काम करणाऱ्या 1000 हून अधिक कामगारांना उद्ध्वस्त केले जाणार हे स्पष्ट आहे.