रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; भाजप-शिंदे सेनेत रस्सीखेच अन् राणे आणि सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
त्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजप-शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर यापूर्वीच महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिढा आता आणखी वाढल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजप-शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी ४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. किरण सामंत याच मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. इतकंच नाहीतर हे दोघेही लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती मिळतेय. या दोन्ही इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याने उमेदवार कोण? आता याची चर्चा सुरू झाली आहे. या मतदार संघात ७ मे रोजी मतदान असून १२ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारी भरण्यासाठी फक्त ४ दिवस बाकी राहिले आहेत.