पंतप्रधान मोदींमुळे मालवण, तारकर्ली बीचवर कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमकं कारण?

| Updated on: Nov 28, 2023 | 5:57 PM

आजपासून 8 दिवस मालवणमध्ये पर्यटन बंद असल्याने पर्यटकांमध्ये हिरमोड पाहायला मिळत आहे. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हे समुद्री पर्यटन बंद असणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर ही पर्यटकांना जाता येणार नाही. नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू येणार

सिंधुदुर्ग, २८ नोव्हेंबर २०२३ : येत्या 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदर हद्दीतील समुद्री पर्यटनास आजपासून बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे इतर वेळी पर्यटकांनी फुलून जाणाऱ्या मालवण समुद्र किनारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आजपासून 8 दिवस मालवणमध्ये पर्यटन बंद असल्याने पर्यटकांमध्ये हिरमोड पाहायला मिळत आहे. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हे समुद्री पर्यटन बंद असणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर ही पर्यटकांना जाता येणार नाही. नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू येणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने येथील पर्यटन बंद करण्यात आले आहे. मालवण बंदर हद्दीतील मासेमारी, समुद्री प्रवासी वाहतूक, जलक्रीडा यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मालवण समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

Published on: Nov 28, 2023 05:57 PM
‘तो’ माणूस नालायक, त्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी शिंदे गटातील जिल्हाध्यक्षांचा भाचा? मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल