कोकणातील विकास हा श्वाश्वत विकास पाहिजे
कोकणात तात्पुरत्या विकासाची गरज नसून कोकणात श्वाश्वत विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गणपुतळे येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले कोकण पर्यटनाच्यादृष्टीने विकसित झाला पाहिजे.
कोकणात तात्पुरत्या विकासाची गरज नसून कोकणात श्वाश्वत विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गणपुतळे येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले कोकण पर्यटनाच्यादृष्टीने विकसित झाला पाहिजे. त्यामुळे येथील भूमीपुत्रांना रोजगार आणि व्यवसायाची संधी मिळणार आहे. सध्या मंत्री मंडळातील अनेक मंत्री कोकणाच्या दौऱ्यावर येतात आणि महाविकास आघाडीनी दिलेली अश्वासनं पूरी करण्याचे प्रयत्न केला जातो आहे. मुख्यमंत्र्यांनीही कोकणाचा विकास करण्यासाठी विशेष भर देण्याची सूचना केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कोकणच्या विकासासाठी आणि पर्यटनाच्या विकासासाठी येत्या काही दिवसात देशातील सगळ्यात वेगवान बोट येथे येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.