Sahasrakund Waterfall : निसर्गरम्य परिसर अन् पांढराशुभ्र फेसाळणारा धबधबा, ‘सहस्त्रकुंड’ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

| Updated on: Aug 01, 2024 | 5:18 PM

नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून हा धबधबा पाहता येतो. पैनगंगा नदीला पाणी आल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. ३० ते ४० फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो.

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून हा धबधबा पाहता येतो. पैनगंगा नदीला पाणी आल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. या धबधब्याचा परिसरही निसर्गरम्य आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची इथे गर्दी होत असते. ३० ते ४० फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात मोडतो.

Published on: Aug 01, 2024 05:18 PM
साताऱ्यात खळबळ… एकाच वर्गात जुळलं प्रेम, संशयाने केला घात.. त्यानं तिला घरी बोलवलं अन्…
राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार? अजित पवार गटानं गाठलं पोलीस स्टेशन अन्…