दाट धुकं, फेसाळणारे धबधबे अन् हिरवागर्द निसर्ग… महाबळेश्वर येथील ‘या’ 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी, कारण काय?

| Updated on: Jul 23, 2024 | 4:31 PM

Mahabaleshwar Lingmala waterfall : महाबळेश्वरचा प्रसिद्ध असा लिंगमळा धबधबा वेण्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. तसेच लिंगमळा धबधब्याचा परिसर धोकादायक ठिकाणी काटेरी तार आणि काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आला आहे.

सध्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील प्रसिद्ध लिंगमळा (Lingmala) धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. मुसळधार पावसाने लिंगमळा धबधब्याचे नयनरम्य आणि विलोभनीय रूप पाहावयास मिळत आहे. दाट धुक्यात निवांत वेळ घालविण्यासाठी पर्यटकांची पावले लिंगमळा धबधब्याकडे वळतायत. मात्र महाबळेश्वरचा प्रसिद्ध असा लिंगमळा धबधबा वेण्णा नदीवरील पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. तसेच लिंगमळा धबधब्याचा परिसर धोकादायक ठिकाणी काटेरी तार आणि काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आला आहे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने देखील ऑर्थोसीट पॉईंट परिसरातील इतर 12 पॉईंटवर पर्यटकांना जाण्यास बंदी केली आहे. मुसळधार पावसामुळे या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. सध्या लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत असल्यामुळे डोंगर कपारीतून पडणारा हा धबधबा डोळ्याचे पारणे फेडत आहे. मात्र प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सध्या हा धबधबा बंद केला आहे.

Published on: Jul 23, 2024 04:30 PM
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, ‘या’ 10 मोठ्या घोषणा
वडील दादांच्या राष्ट्रवादीत अन् मुलानं हजेरी लावली मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात; झिरवळ कुटुंबात चाललंय काय?