किल्ले रायगडावर ढगफुटी की आणखी काही? काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ पाहिलात?

| Updated on: Jul 09, 2024 | 11:02 AM

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच किल्ले रायगडच्या महाद्वारातून इतक्य़ा फोर्सने पाणी वाहतांना पाहिला मिळालं. किल्ल्यातील कडे-कपाऱ्यातील धबधब्यांनी सर्व वाटा बंद केल्यात. अनेक पर्यटक रायगडवर अडकून पडले तर काहींची सुखरूप सुटका करण्यात आली. बघा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

लाखो शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असलेला स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या व्हायरल व्हिडीओने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. काहींच्या सांगण्यानुसार रायगड किल्ला परिसरात ढगफुटी झाल्यानं भयानक परिस्थिती ओढावली. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच किल्ले रायगडच्या महाद्वारातून इतक्य़ा फोर्सने पाणी वाहतांना पाहिला मिळालं. किल्ल्यातील कडे-कपाऱ्यातील धबधब्यांनी सर्व वाटा बंद केल्यात. अनेक पर्यटक रायगडवर अडकून पडले तर काहींची सुखरूप सुटका करण्यात आली. रायगडावर किती तुफान पाऊस झाला हे व्हायरल व्हिडीओवरून लक्षात येईल. सुरूवातील अडकलेल्या पर्यटकांना रोप वे च्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. मात्र नंतर सुरक्षेच्या कारणास्तव रोप वे देखील बंद करण्यात आले. दरम्यान काल जी किल्ले रायगडावर परिस्थिती उद्भवली ती नैसर्गिक होती की मानवनिर्मित असाच सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.