मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक बदल, यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला असून ईस्टर्न फ्री हायवेवरील वाहतूक डीएन रोड आणि जेजे ब्रीज रोडवर वळवण्यात येणार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मोदी मुंबई सोलापूर, मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीएसएमटी स्थानकाची पाहणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हा आढावा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून मुंबईभर मोदींच्या स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला असून ईस्टर्न फ्री हायवेवरील वाहतूक डीएन रोड आणि जेजे ब्रीज रोडवर वळवण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसात महाविकास आघाडीला धक्का बसणार असून मविआतील २० ते २५ आमदार फुटणार असून ते शिंदे आणि भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता… बच्चू कडू यांना असा दावा केला असून या दाव्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.