Breaking | ठाणे -भिवंडी बायपास रोडवर वाहतूक कोंडी
ठाणे भिवंडी बायपास रोडवर मागील बराच वेळेपासून वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा प्रवास संथगतीने सुरु आहे. ज्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. मागील बराच काळापासून वाहनांची वाहतूक अतिशय संथगतीने होत आहे. तब्बल 5 किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जवळपास मागील 4 तासांपासून ही वाहतू कोंडी झालेली आहे. अद्यापही ही वाहतूक कोंडी तशीच आहे.
या वाहतूक कोंडीमुळे संबधित मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. संपूर्ण मार्गावर अनेक वाहने अंत्यत संथगतीने पुढे सरकत आहेत. त्यामुळे बराच काळ एकाच जागी नागरिकांना अडकून रहावे लागले आहे. अशामध्ये तातडीची काम असणारे नागरिक चिंतेत सापडले आहेत.
Published on: Aug 21, 2021 05:52 PM