St Employees Strike : अनिल परब अॅक्शन नोडमध्ये? पाठवणार नोटीस?
संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर (St Employees Strike) कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे.
संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर (St Employees Strike) कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. निलंबित केलेल्या 10 हजार कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देणार आहे. सेवेतून बडतर्फ का करू नये? यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीशीनंतर संपावरील कर्मचाऱ्यांना 8 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. 20 तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल, तोपर्यंत कामावर या, असं आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी पुन्हा एकदा केले आहे.