Beed | राखेच्या वाहतुकीविरोधात परळीमध्ये महिला आक्रमक, चालकाला महिलांनी दिला चोप
बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावातील महिला अवैधरित्या आणि खुलेआम होणाऱ्या राखेच्या वाहतुकीविरोधात आक्रमक झाल्या आहेत. उघड्या वरून राखेची वाहतूक होत असल्यानं तसंच परिसरात राखेचे लोट पसरत असल्याने त्यांनी राखेची वाहतूक करणारी गाडी अडवून थेट ड्रायव्हरलाच चोप दिला.

पांगरी गावच्या परिसरात राखेच्या वाहतुकीमुळे महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय. याच विरोधात पांगरी गावातील महिला आक्रमक झाल्या असून राखेची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून, गाडी चालकांकडून या महिलांनी रस्त्यावर जमा झालेली राख साफ करून घेतलीय.