विजयकुमार गावित यांच्याकडून ‘त्या वक्तव्यावर खुलासा, केलं नवं वक्तव्य म्हणाले, ‘ऐश्वर्या राय माझ्या…’

| Updated on: Aug 21, 2023 | 11:14 PM

VIDEO | राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित यांचं 'त्या' वक्तव्यावर पुन्हा नवीन वक्तव्य, त्यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी मांडली आपली भूमिका, पाहा नेमकं काय म्हणाले?

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | ‘दररोज मासे खाल्ल्यानं ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल तर तुमचेही डोळे सुंदर होतील. त्यानंतर तुम्ही ज्याला पटवायचं त्याला पटवा’असं वक्तव्य केल्याने राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाल्यानंतर विजयकुमार गावित यांच्याकडून वक्तव्यावर खुलासा करण्यात आला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा गावित यांनी केलाय. ऐश्वर्या राय ही माझ्या मुलीसारखी आहे, असंही गावित म्हणाले आहेत. फिश ऑईलचे फायदे आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले असल्याचं मी म्हणालो, असंही गावित म्हणाले.  तर त्यांच्या या वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मासे खा, चेहरा चिकना होईल… कुणीही पटवून घेईल, असं त्यांचं वक्तव्य योग्य नसल्याचं मत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडलं आहे. विशेष म्हणजे विजयकुमार गावित हे डॉक्टर आणि माजी वैद्यकीय शिक्षणमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Published on: Aug 21, 2023 11:10 PM
पुण्यात पुन्हा मोठा ड्रग्स साठा, अफीम विक्री ठिकाणांचा पोलिसांकडून शोध; कोणत्या भागात झाली कारवाई?
वय वर्ष अवघं 94, या वयातही आजीबाई तरतरीत, शिवनेरी किल्ला केला सर