स्वातंत्र्यदिनानिमित्त भीमाशंकर मंदिरातील भारताच्या नकाशाची तिरंगी आरास पाहिलीत का?
VIDEO | पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात स्वतंत्र्यदिनाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी, मंदिरात भारताच्या नकाशाची प्रकृती तयार करून त्यावरती तिरंगी फुलांची आरास
पुणे, १५ ऑगस्ट २०२३ | देश आज 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं, पंतप्रधानांची ध्वजारोहण करण्याची ही 10 वी वेळ आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 75 जोड्यांना पारंपारिक वेषात समारंभासाठी निमंत्रित केलं आहे. या कार्यक्रमात देशभरातून 400 पेक्षा जास्त सरपंच, 250 शेतकरी आणि सेंट्रल विस्टाशी संबंधित कामगार सहभागी होते. राज्यात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सलग सुट्ट्या आणि स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते याच निमित्ताने मंदिरांमध्ये भारताच्या नकाशाची प्रकृती तयार करून त्यावरती तिरंगी फुलांची आरास साकारण्यात आली आहे ही केलेले आरास पाहण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली आहे तर गेल्या दोन ते तीन दिवस सलग सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी भीमाशंकर येथे पाहायला मिळतं आहे.