नव्या वाहन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक, अनेक ठिकाणी संप; काय आहे ‘हिट अँड रन’ प्रकरण?
ट्रक चालकांनी तीन दिवसीय संप पुकारून या कायद्यात बदल करावा अशी मागणी ट्रक चालकांनी केलीये. तर यासंपामुळे पेट्रोल पंपासमोर मोठ्या रांगा लागल्याचेही पाहायला मिळत आहे. १ जानेवारी ते ३ जानेवारीपर्यंत काही संघटना संपावर गेल्यात तर नागपूर, वसई, अकोला, मनमाड, अमरावती, गोंदियासह अनेक ठिकाणी ट्रकचालक आक्रमक
मुंबई, २ जानेवारी २०२४ : केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यामध्ये दुरूस्ती करा, याकरता देशभरातील ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. ट्रक चालकांनी एखाद्या कायद्याला विरोध करणं ही गोष्ट नवीन वाटू शकते, मात्र त्यामागे काही कारणं आहेत. ट्रक चालकांनी तीन दिवसीय संप पुकारून या कायद्यात बदल करावा अशी मागणी ट्रक चालकांनी केलीये. तर यासंपामुळे पेट्रोल पंपासमोर मोठ्या रांगा लागल्याचेही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह अनेक मोठ्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालक आणि त्यांच्या संघटनांनी आंदोलनं केलीत. १ जानेवारी ते ३ जानेवारीपर्यंत काही संघटना संपावर गेल्यात तर नागपूर, वसई, अकोला, मनमाड, अमरावती, गोंदियासह अनेक ठिकाणी ट्रकचालक आक्रमक होत त्यांनी आंदोलनं केलीत. एखादा ट्रकचालक धडक देऊन पळून गेल्यास त्याला ३ वर्षांची कैद असा पूर्वीचा कायदा होता. तर नव्या कायद्यानुसार, चालकाला १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड केला केलाय. काय आहे सरकारची बाजू आणि ट्रक चालकांची बाजू बघा स्पेशल रिपोर्ट…