VIDEO : पंतप्रधान मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!

| Updated on: Sep 14, 2024 | 3:30 PM

लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रिय गौमातेने एका गोंडस वासराला जन्म दिला आहे. त्याच्या मस्तकावर ज्योतीचं चिन्ह असल्याने मी त्याचं नाव 'दीपज्योती' ठेवलं आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. पंतप्रधान जे काही करता त्याची माहिती ते त्यांच्या देशभरातील फॉलोअर्सपर्यंत आवश्य पोहोचवत असतात. अशातच मोदींनी आपल्या फॉलोअर्ससोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडिया ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या घरात एका खास पाहुण्याचं आगमन झाल्याचे सांगितले आहे. नुसतं आगमनच नाहीतर त्या पाहुण्याचं नामकरण देखील मोदींनी केलं आहे.

या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपल्या धर्मग्रंथात असे म्हटले आहे – गाव: सर्वसुख प्रदा: लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान यांच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रिय गौमातेने एका नवीन वासराला जन्म दिला आहे. ज्याच्या कपाळावर ज्योतीचं चिन्ह आहे. म्हणून त्याचे नाव ‘दीपज्योती’ असे ठेवले आहे. पंतप्रधान मोदींनी फोटोसह एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यावर लोक कमेंट करत आहेत.

पंतप्रधान मोदींनी दीपज्योतीचे स्वतःसोबतचे काही फोटोही ट्वीटरवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये मोदी या गोंडस वासराचे लाड करताना दिसत आहेत. मोदींनी आपल्या घराच्या देवघरात दीपज्योतीला हार घातला आणि तिला आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांना तिला मिठीही मारली आहे. दीपज्योती आणि पंतप्रधानांच्या इतक्या जवळ असल्याने असे भासत होते की जणू ते दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत आणि या वासराबरोबर पंतप्रधान रममाण झाल्याचे दिसत आहेत.

Published on: Sep 14, 2024 03:29 PM