‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘… काही हरकत नाही’

| Updated on: May 12, 2023 | 11:31 AM

VIDEO | प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर तृप्ती देसाई म्हणताय....

पुणे : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटात अदा शर्मा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 5 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अजूनही काही राज्यांमध्ये या चित्रपटाला विरोध केला जात आहे. मात्र या वादानंतरही चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. अशातच द केरळ स्टोरीवर भाष्य करताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट हे वेगवेगळ्या विषयांवरती येत असतात आणि कुठल्या चित्रपटाला एखादा समुदाय विरोध करतो किंवा एखाद्या चित्रपटाला एखादा समुदाय पाठिंबा देतो. त्यापेक्षा एखादा कोणी चांगला विषय मांडत असेल, तर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. त्यामुळे द केरला स्टोरीला अनेक हिंदुत्वादी संघटना हिंदुत्ववादी राज्यात यामध्ये उत्तर प्रदेश मध्य प्रदेश असेल तिथं तो चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलेला आहे तर आणि काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे. परंतू द केरला स्टोरीची पूर्ण स्टोरी मला माहित नाही, त्यामुळे मी यावर जास्त काही बोलणार नाही. परंतु एखादा निर्माता एखादा दिग्दर्शक वेगवेगळा विषय मांडत असतो, त्याच्या परीने तो मांडत असतो त्यामुळे चित्रपट म्हणून बघायला काही हरकत नसल्याचे तृप्ती देसाई यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

 

 

Published on: May 12, 2023 11:28 AM
Light Bill : एकीकडे अवकाळीने त्रस्त, दुसरीकडं वीज दर वाढीचा नाशिककरांना शॉक!
CBSE Board | सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, किती टक्के लागला रिझल्ट अन् कोणी मारली बाजी?