Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्राला Olympic पदक मिळवून देऊ, ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्यांचा विश्वास
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 चे विजेता शिवराज राक्षे, उपविजेता महेंद्र गायकवाड आणि या दोघांचे गुरू यांच्याशी टीव्ही 9 ने Exclusive केलेली बातचीत... बघा खास मुलाखत
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे हा विजेता ठरला. शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याचा पराभव करत चांदीची मानाची गदा पटकवत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या सामन्याचे आयोजन हे स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी कोथरुड पुणे इथे करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरीत तगड्या मल्लांचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. तर यावेळी दिग्ग्जांची देखील उपस्थिती होती.
दरम्यान, पुण्याच्या काकासाहेब तालमीतील एकाच गुरूच्या दोन मल्लांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची चांदीची गदा पटकावली आणि या तालमीतील शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेता तर महेंद्र गायकवाड याने उपविजेता होण्याचा मान मिळवला. यानिमित्ताने महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे, उपविजेता महेंद्र गायकवाड आणि या दोघांचे गुरू यांच्याशी टीव्ही 9 ने Exclusive केलेली बातचीत…