TV9 Festival of India : भाजप खासदार मनोज तिवारी यांच्याकडून संगिताच्या माध्यमातून देवीला नमन
दिल्लीत नवरात्रीच्या निमित्ताने TV9 नेटवर्कने TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया (TV9 Festival Of India) या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला भाजप खासदार मनोज तिवारी यांनी ही हजेरी लावली. त्यांनी गीत गायले. यावेळी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले.
नवी दिल्ली : नवरात्रीचा एक भाग म्हणून TV9 नेटवर्कने आयोजित केलेल्या TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया ( TV9 Festival Of India ) मध्ये भाजप खासदार मनोज तिवारी यांनी देवी दुर्गाला संगिताच्या माध्यमातून नमन केले. TV9 ग्रुपचे एमडी आणि सीईओ बरुण दास 20 ऑक्टोबर रोजी उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते. मनोज तिवारी, जे एक भोजपुरी गायक देखील आहे. त्यांनी दुर्गापूजेदरम्यान एक भक्तिगीत गायले. TV9 नेटवर्कने सादर केलेल्या TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री गोपाल राय, भाजप नेते तरुण चुघ, खासदार गौतम गंभीर हे देखील उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही उत्सवात पोहोचून देवीचे आशीर्वाद घेतले.
Published on: Oct 22, 2023 11:26 AM