Tv9 Marathi ने रचला इतिहास; महाराष्ट्रात नंबर 1 न्यूज चॅनेल!

| Updated on: Mar 17, 2022 | 2:01 PM

तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे. ऐन होळीच्या दिवशी ‘टीव्ही 9 मराठी’ने रंगांची उधळण केली आहे. 29 रेटिंग मिळवत ‘टीव्ही 9 मराठी’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘टीव्ही 9 मराठी’च्या ऑफिसमध्ये जल्लोष करण्यात आला. ‘टीव्ही 9 मराठी’चे संपादक उमेश कुमावत (Umesh Kumavat) यांनी महाराष्ट्रातील […]

तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे. ऐन होळीच्या दिवशी ‘टीव्ही 9 मराठी’ने रंगांची उधळण केली आहे. 29 रेटिंग मिळवत ‘टीव्ही 9 मराठी’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘टीव्ही 9 मराठी’च्या ऑफिसमध्ये जल्लोष करण्यात आला. ‘टीव्ही 9 मराठी’चे संपादक उमेश कुमावत (Umesh Kumavat) यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. “तुमच्या सगळयांच्या पाठिंब्यामुळे हे सगळं शक्य झालं. इथून पुढेही आम्ही सत्य मांडत राहू. लोक हिताच्या बातम्या देत राहू. सगळ्यांचे आभार”, असं उमेश कुमावत म्हणाले.

Published on: Mar 17, 2022 02:00 PM
काँग्रेसच्यावतीने ‘टीव्ही 9 मराठी’चं अभिनंदन- नाना पटोले
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 17 March 2022