मविआची ४२ जागांची यादी TV9 कडे… काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाला कुठं कोणती जागा?

| Updated on: Mar 03, 2024 | 10:28 AM

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप निश्चित झालंय. काही जागांवर अंतिम शिक्कामोर्तब 5 किंवा 6 तारखेच्या बैठकीत होणार आहे. पण 42 जागांवर मोहोर लागली असून, त्या जागांची आणि संभाव्य उमेदवारांची माहिती 'TV9 मराठी'च्या हाती लागली आहे.

Follow us on

मुंबई, ३ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचं जागा वाटप निश्चित झालंय. तर काही जागांवर अंतिम शिक्कामोर्तब ५ किंवा ६ तारखेला होणाऱ्या बैठकीत होणार आहे. पण ४२ उमेदवारांची मोहोर लागली असून त्या जांगांची संभाव्य नावं टीव्ही ९ मराठीला मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात एकमत झालं असून उमेदवार ठरल्याची माहिती टीव्ही ९ ला मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे कोणत्या जागांवर कोण उमेदवार असणार हे देखील समोर आले आहे. दरम्यान, अकोल्याची जागा वंचितसाठी सोडली जाणार, तर हातकंणगलेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली जाणार आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी मविआला पुन्हा इशारा देत असे म्हटले की, स्वतंत्र लढल्यास आम्ही ६ जागा जिंकू… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…