Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना न सांगताच किरीट सोमय्यांवर कारवाई?
किरीट सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. त्यामुळे आघाडीत समन्यवाचा अभाव असल्याचं उघड झालं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवरील कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही. गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे, असं आज वारंवार स्पष्ट केलं. त्यामुळे आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचं चित्रं असतानाच आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. त्यामुळे आघाडीत समन्यवाचा अभाव असल्याचं उघड झालं आहे.
किरीट सोमय्या यांना कराडमध्ये अडवण्यात आल्याच्या घटनेवर दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नॉर्मली अशी घटना घडते तेव्हा वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांना ब्रिफिंग करतात आणि मुख्यमंत्र्यांनाही ब्रिफिंग करत असतात. मात्र या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग केलं की नाही केलं मला माहिती नाही, असं सांगतानाच कालच्या घटनेशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. कारवाईचा जो काही निर्णय आहे, तो गृहमंत्रालयाने घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे, असं वळसे पाटील म्हणाले.