WITT Global Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले…
टीव्ही 9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या कार्यक्रमातील भाषणाला दमदार सुरूवात कली. थँक्यू दास... टीव्ही9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि उपस्थितांनाही.
नवी दिल्ली, २६ फेब्रवारी २०२४ : टीव्ही 9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या कार्यक्रमातील भाषणाला दमदार सुरूवात कली. आपल्या इथे जुन्या काळात युद्धात जाण्यापूर्वी जोरात शंख वाजवला जायचा कारण जाणारा जोशात जावा. थँक्यू दास… टीव्ही9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि उपस्थितांनाही. मी नेहमीच भारताच्या डायव्हर्सिटीची चर्चा करतो. या डायव्हर्सिटीला टीव्ही9च्या न्यूज रुममध्ये दिसून येते. टीव्ही9च्या अनेक भारतीय भाषात तुम्ही भारताची व्हायब्रंट लोकशाही त्याचे प्रतिनिधीही आहात. मी विविध राज्यात, विविध भाषेत टीव्ही9 मध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकारांचा, तुमच्या टेक्निकल टीमचं अभिनंदन करतो, असे मोदी यांनी म्हटले.
ते पुढे असेही म्हणाले की, मित्रांनो, आज टीव्ही9च्या टीमने या समीटसाठी मोठा इंटरेस्टिंग टॉपिक निवडला आहे. बिग लीप तर आम्ही तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण जोशात असू. ऊर्जाने भरलेलो असेल. कोणी हताश, निराश देश असो की व्यकीत बिग लीपच्या बाबत विचार करू शकत नाही. ही थीमच सर्व सांगण्यासाठी पुरेशी आहे की, आजच्या भारताचा आत्मविश्वास किती उंचावर आहे. आकांक्षा काय आहेत. आज जगाला वाटतंय भारत एक मोठी झेप घ्यायला तयार आहे. तर त्याच्या पाठी दहा वर्षाचा पॉवर फुल लॉन्च पॅड आहे. दहा वर्षात असं काय बदललं. की आज आम्ही इथपर्यंत आलोय, असे म्हटले.